धक्कादायक! पोलीसाची महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी;म्हणे, तुझ्याजवळ झोपायचे आहे! बुलडाणा पोलीस दलातील धक्कादायक प्रकार....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलदाणा जिल्हा पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. तशी तक्रार पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्याने संबधित पोलीस ठाण्यात दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात आरोप पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला देखील सहआरोपी करण्यात आले आहे..
 पीडित महिला पोलीस कर्मचारी व आरोपी पोलीस कर्मचारी बुलदाणा जिल्हा पोलीस दलात एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारी नुसार घटना नोव्हेंबर महिन्यातल्या ४ तारखेची आहे. आरोपी पुरुष पोलीस कर्मचारी पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्यास म्हणाला की, "तू मला खूप खूप आवडते, मला तुझ्याजवळ झोपायचे आहे". वाईट उद्देशाने पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोपी पिडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारीत केला आहे. शिवाय आरोपी पोलिसाच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने महिला पोलिसाकडे उसने असलेल्या ८ लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. महिला पोलीस कर्तव्यावर असताना आरोपी पोलिसाच्या पत्नीने तिला मारहाण करून सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा आणण्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी व त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.