धक्कादायक! बुलढाणा जिल्ह्यात १० महिन्यांत ४० मर्डर; महिलाही सुरक्षित नाहीत, १०३ बलात्कारांच्या घटना....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे. २०२४ च्या १० महिन्यांतील आकडा समाजाची चिंता वाढवणारा आहे. गेल्या १० महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यात ४० खुनाच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय बलात्काराच्या १०३ घटनांची नोंद जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात आहे..
  बुलढाणा जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर या दहा महिन्यांत ४० खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३८ घटनांचा पोलिसांनी यशस्वी तपास केला आहे. मात्र अद्याप २ घटनांचा उलगडा पोलिसांना करता आलेला नाही. अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत स्टेशन हत्तीत असोला शिवारात एका विवाहित महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता, तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळ्यल्याचे समोर आले होते. मात्र त्या मृत महिलेची ओळख नऊ महिने उलटूनही पटलेली नाही, त्यामुळे त्या खुनाचा उलगडा होऊ शकलेला नाही. शिवाय अशाच पद्धतीची एक घटना किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती, त्या घटनेत देखील विवाहितेचा खून करून जाळले होते मात्र त्या महिलेची देखील ओळख पटली नसून खून कुणी केला हे अद्याप समोर आलेले नाही.गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात ३१ खुनाच्या घटनांची नोंद होती, यंदा तो आकडा ४० एवढा झाला आहे..
  बलात्काराच्या घटना वाढल्या..
दरम्यान बलात्काराच्या घटना देखील यंदा जिल्ह्यात वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीत महिला अत्याचाराचा मुद्दा वारंवार विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात होता, आता बुलढाणा जिल्ह्यातील चित्र पाहता गेल्या दहा महिन्यात १०३ बलात्काराच्या घटनांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ९१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुले मुलींच्या अपहरणाच्या १६९ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत...