मेहकरात उबाठा शिवसेनेचा मोर्चा; नरेंद्र खेडेकर आणि जालिंधर बुधवतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात! गद्दारांना गाडा म्हणाले..
Oct 3, 2024, 17:57 IST
राज्यात आतापर्यंतचे सर्वात महाभ्रष्टाचारी सरकार आहे. या सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांनी संदर्भात काही देणे घेणे. सोयाबीन कापसाला भाव नाही, खाद्यतेल मात्र प्रचंड महागले आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ करायला सरकार जवळ पैसा आहे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला सरकार तयार नाही. हे सरकार गद्दारांचे आहे.. शिवसेनेने तीनदा आमदार, तीनदा खासदार बनवले तरी हे म्हणतात की अन्याय झाला..यांना लाज कशी वाटत नाही असा घनाघात जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. जालिंधर बुधवंत म्हणाले की, राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. हे सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. शेतकरी मेला तरी या सरकारला काही फरक पडत नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दारांना गाडा आणि निष्ठावंतांना निवडून आणा असे जालिंधर बुधवंत म्हणाले. मोर्चाला आशिष रहाटे, डॉ. गोपाल बच्छिरे, किशोर गारोळे, दिलीप वाघ ,सिद्धार्थ खरात यांचीही उपस्थिती होती.