मोताळ्यात उबाठा शिवसेनेचा तहसीलदारांना घेराव! जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आक्रमक; अतीवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी;

म्हणाले, पंचनामे करा, कार्यालयात बसू देणार नाही...
 
मोताळा
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गत दोन दिवसांत पावसाने थैमान घातले. आधी पावसाअभावी पिके सुकून गेली होती, मात्र पाऊस एवढा बरसला की अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः पाण्यात गेली. मोताळ्यात देखील पावसाने कहर केला. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांच्या बांधावर जा आणि तातडीने आर्थिक मदत द्या अशी मागणी बुधवंत यांनी तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाकडे केली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशाराही बुधवंत यांनी यावेळी दिला.
अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांपुढे जगावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासन केवळ पोकळ घोषणा करत आहेत. शेतकरी जगला काय अन् मरला काय या लबाड सरकारला काही सोयरसुतक नाही. मात्र आता अतिवृष्टीने हैरान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात शासनाने विलंब केला तर मात्र गाठ शिवसेनेशी आहे हे शासनाने ध्यानात घ्यावे. तहसीलदारांनी ,तलाठ्यांनी तातडीने पंचनामे करावे व मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असेही श्री. बुधवंत यावेळी म्हणाले.
निवेदन देतेवेळी रामदास सपकाळ,उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, सुधाकर सुरडकर, भागवत शिकारे, तालुका संघटक राजु बोरसे, अनंता शिप्पलकर, मुकुंदा शिरसागर, किरण हुंबड, संजय रोढे, विष्णू पाटील, निलेश पाटील, राजु सुरडकर , गजानन कुकडे, गुलाबराव व्यवहारे, भास्कर शिंदे, प्रवीण राजपूत, चंद्रसिंग साबळे, दगडू पाटील, दिलीप शेळके, संतोष निंबाळकर, दत्ता सपकाळ, आकाश दांडगे, निर्मलकुमार इंगळे, अनंता पाटील, राजू झुंजारके, अमोल नखोद, साहेबराव पाटील, शांताराम पाटील यांच्यासह शेतकरी बांधव, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.