सिंचनाच्या प्रश्नावरही लढली रणरागिणी! "पैनगंगेपर्यंतच्या जलसमृद्धी"साठी पुन्हा एकदा आमदार व्हाव्यात श्वेताताई! सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावल्या...
Nov 6, 2024, 18:36 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी आत्महत्याग्रस्त हा डाग लागलेला विदर्भ आणि त्यातील बुलडाणा जिल्हा खरंतर ही नाचक्कीची बिरुदावली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत सिंचन सुविधा शिवाय शेतकरी सुखी होत नसल्याचे वास्तव असल्याने आमदार श्वेताताई महाले यांनी वैनगंगा - नळगंगा या प्रकल्पासाठी केलेला पाठपुरावा मार्गी लागला आणि राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये या प्रकल्पाला मंजूरात देऊन निधीची तरतूद ही केली. गोसेखुर्द प्रकल्पातील ही "जलसंपदा" चिखलीपर्यंतच्या पेनटाकळी प्रकल्पात आल्यास नक्कीच "जलसमृद्धी" साधल्या जाणार आहे. त्यामुळे सिंचनाच्या प्रश्नावर लढणारी हक्काची ताई पुन्हा एकदा विधानसभेत आमदार म्हणून जाव्यात अशा प्रतिक्रिया सामान्य जणांमधून व्यक्त होत असून जन माणसाच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पातून महाराष्ट्राच्या अर्थात विदर्भाच्या वाट्याचे पाणी वाहून जाते. त्यावर गोसेखुर्द प्रकल्पातील असलेला हा वैनगंगा नदीतून मोताळा तालुक्यातील नळगंगा पर्यंत पाणी आणण्याचा प्रकल्प म्हणजेच वैनगंगा नळगंगा प्रकल्प. याच प्रकल्पातील पाणी पुढे चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प म्हणजेच पैनगंगेपर्यंत आणल्यास घाटावरचा भाग देखील तीन पिकांचा हंगाम साधून शेतकरी सुखी होऊ शकतो इतकी ताकद या प्रकल्पामध्ये आहे.
राज्य सरकारने विदर्भातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प विदर्भातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेला मोठा चालना देणार आहे. या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांनी विधिमंडळामध्ये विविध प्रश्नांवर केला आहे. हा प्रकल्प वैनगंगा नदीचे पाणी नळगंगा नदीत वळवणार आहे. यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीपुरवठा होऊन सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होईल.नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिकांना या प्रकल्पाचा लाभ होईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३,७१,२७७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भाच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भाचा सर्वांगीण विकास होईल. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भाच्या शेतीला नक्कीच नवीन ऊर्जा देणारा आहे. पुढे हेच पाणी पेनटाकळी पर्यंतच्या पैन गंगेपर्यंत आणण्याचा मानस आमदार श्वेताताई महाले यांनी बोलून दाखवला आहे. त्यासाठी पाठपुरावा सुद्धा सुरू केला आहे. त्यामुळे सिंचनाच्या प्रश्नावर लढणारी रणरागिणी पुन्हा एकदा आमदार म्हणून जाव्यात अशा प्रतिक्रिया जनसामान्य व्यक्त करत आहेत.
पुनर्वसनाचेही प्रश्न लावले मार्गी !
पेनटाकळी प्रकल्पात जमिनी गेलेले घाणमोडी, मानमोडी या गावाच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न होते. "आधी पुनर्वसन मग धरण" असे काहीशा धोरणाला बगल देत ही गावे वंचित होती. १९९९ पासून त्यांचा प्रश्न शासन दरबारी हेलकावे घेत होता. आता हक्काच्या घरांसह पायाभूत सुविधांचा विकास करून या दोन्ही गावातील गावकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम श्वेताताई महाले यांनी शासन दरबारी जाणीवपूर्वक प्रयत्न करून मार्गी लावले आहेत.