भंगार बस जीवावर उठल्या; धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटला; बस शेतात घुसली पण.. २४ प्रवाशांचा जीव......

 
 मलकापूर पांग्रा (अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात भंगार एसटी बसेच प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. दोन दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील हातनी गावाजवळ शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्याची घटना घडली होती. दरम्यान आता पुन्हा एक नविन घटना समोर आली असून धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसली, सुदैवाने बस नाल्यात अडकली..या घटनेत 24 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत..बस चिखली आगाराची असून बिबी कडून चिखलीकडे जात होती..आज ,९ डिसेंबरला सायंकाळी वाघाळा गावालगत ही घटना घडली...
प्राप्त माहितीनुसार एम एच ४०, एन ९५८४ या क्रमांकाची चिखली आगाराची वाघाळा किनगाव जट्टू ही बस वाघाळ्यावरून मलकापूर पांग्रा कडे जात असताना अचानक बसचा स्टेरिंग रॉड तुटला. त्यामुळे अनियंत्रित झालेली बस स्थानिक शेतकरी कैलास सोनवणे यांच्या शेताजवळ असलेल्या रोडच्या बाजूच्या मोठ्या नालीत अडकली.. या अपघातात २४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.. स्थानिक शेतकऱ्यांनी जखमींना बसच्या बाहेर काढत उपचारासाठी हलवले. 
जखमींची नावे..
 सुभाष शंकर गायकवाड, वैभव रमेश घेवंदे, रामदास कोंडीबा वाघ, सुखदेव विठोबा कोल्हे, पूजा हर्षद सावंत, हर्षद तेजराव सावंत, शशिकला नारायण काकडे, शेख गुलशेर शेख पीर मोहम्मद, शेख साहिल शेख अनिस, शमा बी शेख पत्तु, शबनम प्रवीण अब्दुल लतीफ, अब्दुल लतीफ अब्दुल रज्जाक, गोविंद फकीरा रेंडे, विमल अशोक फत्ते, सत्यभामा गोविंद रेंडे, साई एकनाथ रेंडे, लक्ष्मी सारंगधर खडसे, शेख साहिल शेख अनिस, शेख सलीम शेख मेहबूब, अना नाझीम शेख अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत...