जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंतांनी युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली संजय शिंदेंच्या खांद्यावर! चांगल काम करा म्हणाले...

 
Budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधकामासाठी शिलेदारांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. बुधवंत आपल्या संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. आता युवासेनेच्या तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी बिरसिंगपूर येथील युवानेतृत्व, सरपंचपती संजय शिंदे यांच्यावर सोपवली आहे. आज त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
  संजय शिंदे यांच्यावर बुलडाणा तालुका युवासेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. युवासेनेचे चांगले काम करा, गावागावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारा, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वाने काम करा असे म्हणत जालिंधर बुधवंत यांनी संजय शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, उपतालुका प्रमुख विजय इतवारे, माजी सभापती सुधाकर आघाव यांची उपस्थिती होती.