मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मतदार संघातील प्रत्येक गावात नागरिकांच्या गरजा पाहून विक्रमी विकास कामे करण्यात आली आहेत. इथल्या परिसर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून निधी दिल्याने हे सर्व शक्य झाले. मेहकर लोणार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये नागरिकांचे उदंड प्रेम प्रत्ययास येत असून तुमच्या असीम प्रेमातून उतराई होणे केवळ अशक्य आहे. या निवडणुकीतही धनुष्यबाण निशाणीवर शिक्का मारून गतकाळाप्रमाणेच सहकार्य करा ,असे आवाहन आमदार संजय रायमुलकर यांनी केले. आज,६ नोव्हेंबरला पिंप्रीमाळी, मोळा, लावणा ,रत्नापूर ,मोहना, मारुतीपेठ ,मिस्किनवाडी या गावांमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार संजय रायमुलकर यांनी गाव दौरा केला. प्रत्येक गावामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी व उस्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मोळा येथे झालेल्या सभेत बोलताना संजय रायमुलकर यांनी वरील विचार व्यक्त केले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, दत्ता पाटील ,गजानन माळेकर, बाबरखा पठाण, साहेबराव धोटे, हरिभाऊ शेळके, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, गणेश बोचरे ,कैलास चौरे ,अरुण दळवी, रहाटे सर, राजूभाऊ काटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रचार रॅलीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपल्या भाषणात आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षात या परिसरातील नागरिकांचे खूप मोठे सहकार्य मिळाले असून चौथ्यांदा आहे तुमचा मदतीचा हात मिळेल याची मला खात्री आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघात चार हजार कोटी रुपयांची विकास कामे गेल्या दोन वर्षात पूर्ण केली याचा आनंद आहे. इतिहासात पहिल्यांदा महायुती सरकारच्या माध्यमातून विक्रमी निधी प्राप्त झाला. याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे निश्चितपणे आभार मानले पाहिजे ,असेही ते म्हणाले. सिंचनाच्या सुविधेसाठी कामे, रस्ते बांधकाम, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाने, कब्रस्तान संरक्षण भिंती, सभामंडप, आरोग्य सुविधांची, कामे पर्यटन विकासासाठी कामे, तीर्थक्षेत्र विकासासाठीची भरीव कामे ,पाणीपुरवठा योजना हे सर्व कामे मोठ्या प्रमाणावर करता आली.
पंतप्रधान व मुख्यमंत्री किसान योजना, एक रुपयात पीक विमा ,लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, वयोवृद्धांना मोफत प्रवास आदी योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारने मोठा लाभ सर्व घटकांना मिळवून दिला आहे असे संजय रायमुलकर पुढे म्हणाले. युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देऊन आमदार संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी रामदास धोटे, रमेश पवार, केशवराव शेळके, अनिल धोटे ,सुभाष शेळके, अजदखा पठाण उपस्थिती होते. पिंपरी माळी येथे प्रचार रॅलीत श्यामभाऊ इंगळे ,संतोष झोरे, शिवराम इंगळे ,सुखदेव इंगळे,कोंडीबा जाधव ,प्रदीप जाधव ,गजानन वाघ, गणेश भराड ,सुखदेव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.