संदीप दादांच्या हाती मशाल तर पायाला भिंगरी...मालतीताई सह डोअर टू डोअर प्रचारावर भर! संदीप शेळके म्हणतात, संस्कृती, विचार आणि विकास हा लोकशाहीचा पाया ..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संस्कृती विचार आणि विकास या त्रिसूत्रीवरच ही निवडणूक लढवली जात आहे. हाच लोकशाहीचा पाया असून महाविकास आघाडी साठी सध्याचे वातावरण पोषक आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 'मशाल' घराघरात पोचली असून बुलढाण्याचा सुज्ञ मतदार लोकशाही विचारांना बळ देणार आहे. त्यामुळे विजय हमखास असल्याचे शिवसेनेचे नेते संदीप दादा शेळके म्हणाले. 
चैतन्य वाडी परिसरात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. 
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार जयश्रीताईंच्या प्रचारासाठी संदीपदादा व मालतीताई यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मित्रपरिवार, नातेवाईक व कार्यकर्त्यांसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. सामान्य परिस्थितीतून येऊन शेळके परिवाराने आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले नावलौकिक केला आहे. जयश्रीताई सुनील शेळके विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यात. त्यांच्यासाठी त्यांचे दीर संदीपदादा शेळके पूर्ण ताकतीने झोकुन देऊन प्रचारात उतरल्याचे चित्र आज दिसून आले. निवडणुकीमुळे मने दुरावतात, जवळचे दूर जातात. मात्र बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जयश्रीताई शेळके यांची उमेदवारी शेळके परिवाराला जवळ आणणारी ठरली. संदीप दादा यांच्या लोकसभेत जाण्याच्या महत्त्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही. दरम्यान मधल्या काळात दोघांच्या मध्ये राजकीय पक्षांच्या भिंती आल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले मनोमिलन परिवारासाठी आनंदाची पर्वणी ठरले.शेळके परिवार एकजुटीने प्रचारासाठी उतरल्याचे देखील दिसून येत आहे. संदीप दादा शेळके यांची संपूर्ण टीम, कार्यकर्ते झोकून देऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला भिडल्याने मशाल आणखीच बळकट झाली आहे.
आज विष्णुवाडी, गजानन महाराज मंदिर, चैतन्य वाडी, शाहू नगर परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांनी संवाद साधला. जनतेच्या पायाभूत सुविधांसाठी, सर्वांगीण विकासासाठी उद्धव ठाकरे यांनी हाती दिलेली मशाल हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डी. एस. लहाने, तालुकाध्यक्ष लखनभाऊ गाडेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काकस, नगरसेवक हेमंतभाऊ खेडेकर, अनिलभाऊ बावस्कर, मालतीताई शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते !