सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघावर भगवा फडकणारच! उबाठा शिवसेनेचे दिलीप वाघ यांचे प्रतिपादन;

म्हणाले, सिंदखेड राजाची माती गद्दारी सहन करत नाही! मशाल यात्रेत झाला परिवर्तनाचा जागर...
 

सिंदखेडराजा(ऋषि भोपळे - बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांची तगडी फौज आहे. गद्दार खोके घेऊन पळाले असले तरी गावागावांतील शिवसैनिक उध्दव ठाकरे साहेबांसोबत आहे.त्यामुळे आगामी विधानसभा  निवडणुकीत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात भगवा  फडकणार   म्हणजे फडकणारच.👇

सिंदखेडराजाची भूमी महाराष्ट्राला दिशा देणारी भूमी आहे. ही माती गद्दारी सहन करत नाही, त्यामुळे उद्धव साहेबांसोबत आणि पवार साहेबांसोबत गद्दारी करण्यांना मातीत लोळवल्याशिवाय इथली जनता स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य, उबाठा शिवसेनेचे नेते दिलीप वाघ यांनी केले. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली आहे, या मशाल यात्रेदरम्यान आज,१८ सप्टेंबर रोजी दुसरबीड येथे ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख बद्री बोडखे, तालुका प्रमुख महेंद्र पाटील, युवासेना तालुका प्रमुख सिद्धू आंधळे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनीताई वाघ, अनिल मेहेत्रे, महाजी वाघ,शिवाजी देशमुख बाप्पू,हाफिज सय्यद झाकीर यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advt
Advt.

 

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेनेच्या वतीने २५ मार्चला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आवतन मशाल यात्रेच्या माध्यमातून गावागावातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, घरकुलांचे अनुदान यासह विविध मुद्यांवर दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात मशाल यात्रेत आवाज उठवल्या जात आहे.👇
जनहिताचे मुद्दे घेऊन ही मशाल यात्रा जनतेत जात असल्याने सामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद या मशाल यात्रेला मिळत आहे. गावागावांत होणारे दमदार स्वागत आणि "कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला" या घोषणांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ दणाणून गेला आहे. आज दुसरबीड, केशवशिवणी, तढेगाव, बारलिंगा, खैरव, वाकद, डोरव्ही या गावांत मशाल यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. गावागावांत होणाऱ्या कॉर्नर सभांना दिलीप वाघ यांनी संबोधित केले. महायुती सरकारच्या धोरणांचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला..👇
ही भूमी गद्दारी सहन करत नाही....
 ज्यांना २०१४ ला उद्धव ठाकरे साहेबांनी आमदार केले ते माजी आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी खोके घेऊन पळाले. इथल्या विद्यमान आमदारांनी देखील शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत गद्दारी केली. सिंदखेडराजाची ही भूमी महाराष्ट्राला दिशा देणारी भूमी आहे, त्यामुळे या भूमीत गद्दारांना गाडल्याशिवाय इथली जनता स्वस्थ बसणार नाही असा घणाघात दिलीप वाघ यांनी केला.👇
आमदार शिंगणे यांनी या मतदारसंघाची वाट लावण्याचे पाप केले आहे. इतकी वर्ष मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या सांगायला आमदाराच्या घरी बुलडाण्याला जावे लागते, निवडणुका आल्या की तुम्हाला मतदारसंघ आठवतो. तुम्हाला घरी बसण्यासाठी निवडून दिले आहे का? असा सवालही दिलीप वाघ यांनी आमदार डॉ. शिंगणे यांना केला आहे.