बुलडाणा विधानसभा मतदारसंघात भगवा झंझावात! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत ॲक्शन मोडवर; आज, बूथ प्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा......
Oct 19, 2024, 05:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणूका आता महिनाभरावर आलेल्या असताना इच्छुक उमेदवार आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. बुलडाणा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आणि उमेदवार म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना बुधवंत यांना मातोश्री वरून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज बुलडाणा येथे उबाठा शिवसेनेचा बूथप्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे..
आज,१९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जांभरून रोडवरील गुरुद्वारा समोरील वाय.बी. लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. प्रत्येक बूथचे प्रमुख, शिवसेनेचे शाखाप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर , जिल्हा प्रमुख बुधवंत या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी संवाद राहणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन या मेळाव्यात करण्यात येणार असून जिल्हाप्रमुख आणि संभाव्य उमेदवार असलेले बुधवंत ॲक्शन मोडवर आले आहेत...