ऋतुजा चव्हाण विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व!शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे प्रतिपादन! गावभेट दौऱ्यांना मिळतोय उदंड प्रतिसाद! मुख्य लढाई दोन डॉक्टरांमध्येच...

 
  
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉ.ऋतुजा चव्हाण हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे शेतकरी कष्टकरी, शेतमजूर व वंचित, - उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा त्यांना मिळत आहे. इथली लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असून या लढतीत जनशक्तीचाच विजय होईल असे प्रतिपादन शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्र्वर टाले यांनी केले. डोणगाव येठे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.
 शेतकरी नेत्या - डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात विद्यमान आमदार - तथा शिंदे गटाचे शिवसेना- महायुतीचे उमेदवार डॉ. संजय - रायमुलकर यांच्यासमोर मोठे - जबरदस्त आव्हान निर्माण केले - आहे. दोन शिवसेनेची टोकाची लढाई डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पथ्यावर पडणार आहे. महाविकास आघाडीतील अनेक नाराज नेते डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या संपर्कात आहेत.
Img
Related img.

ठाकरे - गटातील अंतर्गत गटबाजी ऋतुजा चव्हाण यांच्याच पथ्यावर पडणार आहे. या मतदारसंघात - पहिल्यांदाच ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होत असून, - मतदारसंघाच्या विकासाचा रोडमॅप - ऋतुजा चव्हाण यांनी मतदारांसमोर - मांडलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या मतदारसंघात जवळपास बरोबरीची मते घेतली होती. या मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, दलित व बहुजन समाजाची मते ही प्रबळ असून, मराठा व ओबीसी समाजाचा ज्यांना कौल मिळतो, तो या मतदारसंघातून आमदार होत असतो. यावेळेस पहिल्यांदाच या मतदारसंघात परिवर्तानाची लाट निर्माण झालेली आहे.
Tc
Related img.

शेतकरी चळवळ व शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या पाठिंब्यामुळे डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे पारडे जड झाले असून, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मैदानात उतरले आहेत. गावोगावी जाऊन शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते हे डॉ. चव्हाण यांच्यासाठी शेतकरी, कष्टकरीवर्गाच्या भेटीगाठी घेऊन त्यांना शेतकरीहितासाठी ऋतुजा ताईंना निवडून देण्यासाठी साकडे घालत आहेत. या गावभेट दौऱ्यांना उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे...