आक्रोश मोर्चासाठी शिवसेना(उबाठा)पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न!जालिंदर बुधवत म्हणाले, झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आक्रोश मोर्चा....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन २३ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मशाल जागर यात्रा देखील बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगाव करण्यात आली. या मशाल यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नियोजनात्मक पातळीवर बुलढाणा व मोताळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलडाणा विधानसभा मतदार संघात मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मशाल यात्रेचा समारोप दिनांक २३ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाने होणार आहे.

या आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज दि. २० सप्टेंबर रोजी जनशिक्षण संस्था तर मोताळा तालुक्याची बैठक शिवसेना जनसंपर्क कार्यालय मोताळा येथे पार पडली. 

Kayande
Advt. 👆

यावेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, संदीप शेळके, अशोक गव्हाणे, गजानन उबरहंडे, लखन गाडेकर यांनी तर मोताला येथे. सौ चंदाताई बढे, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रामदास सपकाळ, सुनील घाटे, वासुदेव बंडे पाटील शुभम घोंगटे, गजानन ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकील शिवसेना, युवासेना, किसान सेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही पहा...👇

शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवणार - जालिंदर बुधवत ...
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केवळ आणि केवळ घोषणाबाजी हे सरकार करत आहे. सोयाबीन- कापसाचे भाव काय आहेत? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.बेरोजगारांच्या समस्याच्या वाढत आहेत. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवणारच असे याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले.