निष्ठावंत शिलेदाराचा सन्मान! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सोपवली दिलीप वाघ यांच्याकडे महत्वाची जबाबदारी; दिलीप वाघ म्हणाले, सिंदखेडराजा विधानसभेवर भगवा फडकविणारच...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चातून आपल्या कार्यकर्तुत्वाची छाप सोडणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ या निष्ठावान शिलेदाराचा सन्मान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दिलीप वाघ यांच्याकडे सिंदखेडराजा विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर,जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र दिलीप वाघ यांच्याकडे सुपूर्द केले.

सोमवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेतला होता. त्यावेळी आपल्या कार्याचा अहवाल दिलीप वाघ यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिलीप वाघ यांनी काढलेली मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते. त्याचवेळी दिलीप वाघ यांच्याकडे विधानसभा संघटक म्हणून जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान काल,१२ ऑक्टोबर रोजी जनशिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत दिलीप वाघ यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उद्धवसाहेब ठाकरे व जिल्हा नेतृत्वाने सोपविलेल्या जबाबदारीचे यशस्वीपणे निर्वाहन करून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकवणारच असा निर्धार यावेळी दिलीप वाघ यांनी बोलून दाखवला.