बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण जिजाऊनगर करा! आ.संजय गायकवाड यांची विधानसभेत मागणी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने "जिजाऊनगर" करावे अशी मागणी आ.संजय गायकवाड यांनी आज,२५ मार्चला विधानसभेत केली आहे. आ.गायकवाड यांच्या या मागणीचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून जोरदार स्वागत होत आहे.
  आमच्या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंचा जन्म झालेला आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मामुळे पावन झालेला आमचा जिल्हा आहे, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण जिजाऊनगर करावे अशी मागणी आ.गायकवाड यांनी केली. यावेळी आ.गायकवाड यांनी बुलडाणा जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याचे सांगत भिलठाणा चे बुलढाणा झाल्याचे सांगितले. आता बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण जिजाऊ नगर करावे असे आ.गायकवाड म्हणाले...