रविकांत तुपकरांची नवी खेळी! सिंदखेडराजात लावणार ताकद....
रविकांत तुपकरांची महाविकास आघाडीसोबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा चालू होती. बुलढाण्याच्या जागेवर परवा पर्यंत सकारात्मक निर्णय झाला असतांना देखील काल अचानक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुलढाण्याच्या जागेवर दुसऱ्या उमेदवार दिल्याने तुपकरांची महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिसकटली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांचे खंदे समर्थक प्रकाश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात देऊळगावराजा येथे आज एक गोपनीय झाल्याचे समजते त्या बैठकीत प्रकाश गीतेंना मैदानात उतरविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.आता प्रकाश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यादृष्टीने त्यांनी तयारी चालविली आहे. रविकांत तुपकर प्रकाश गीतेंसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत...