पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी तांत्रिक कारण देऊन राहुल गांधींनी येणे टाळले! आमदार श्वेताताईंचा हल्लाबोल; म्हणाल्या,ते गांधी घराण्याचे सुलतान.....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथे आज खा. राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगत राहुल गांधी सभेला पोहोचू शकले नाहीत. दरम्यान आता यावरून आमदार तथा महायुतीच्या उमेदवार श्वेता ताई महाले पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी इथे येऊनही त्यांची सीट विजयी होणार नव्हती त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी तांत्रिक कारण देऊन सभारद्द करण्याचे शहाणपण दाखवले असे श्वेताताई महाले माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
  राहुल गांधी काँग्रेसचे नेते आहेत. गांधी घराण्याचे ते सुलतान आहेत. विमानांचा फौज फाटा त्यांच्यासाठी कायम तयार असतो. आता तर निवडणुकांचा काळ आहे. ते काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. एक विमान बिघडले तर १० विमान त्यांच्या सेवेत तयार असतात. मात्र ते इथे येऊन सुद्धा त्यांची काँग्रेसची सीट विजयी होणार नव्हती काँग्रेस उमेदवाराचा पराभव होतोय हे लक्षात आल्यामुळेच भविष्यात येणारी नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी तांत्रिक कारण देऊन सभेला येण्याचे टाळले असे श्वेताताई म्हणाल्या.