चिखलीत राहुल बोंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन! राहुल बोंद्रे लढवय्ये नेते, पाठीशी उभे रहा! धृपतराव सावळेंचे आवाहन...

 

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघात ५० वर्षे काँग्रेस सत्तेत होती. काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी तसेच शेतकरी व कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा दिला आहे..त्यामुळे काँग्रेस पक्षाशी आपली नाळ सदैव जोडून ठेवणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहावे असे आवाहन माजी आमदार धृपतराव सावळे यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, अखिल भारतीय बुध्दीष्ट सोसायटी इंडीयाचे चेअरमन संदेश आंबेडकर, भाई प्रदिप आंभोरे, ज्योतीताई खेडेकर, नितीन शिंगणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

  यावेळी उद्घाटक म्हणुन पुढे बोलतांना धृपतराव सावळे म्हणाले की चिखली विधानसभा मतदार संघात माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांचे १५ व विद्यमान आमदारांचे ५ असा २० वर्षाचा भाजपाचा कार्यकाळ तर तब्बल ५० वर्ष कॉग्रेसने या विधानसभा मतदार संघावर सत्ता अबाधीत ठेवल्याचा ऐतिहासीक ठेवा आहे. छत्रपती शिवराय, शाहु फुले आंबेडकरी विचार सरणीवर चालणारा मतदार संघ म्हणुुन हया चिखली मतदार संघाची ओळख असल्याचे धृपतराव सावळे म्हणाले. राहुल बोंद्रे लढवय्ये नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवाहन धृपतराव सावळे यांनी केले..
   निवडणुक युध्द असून ती युध्दा प्रमाणेच लढा - सौ.रेखाताई खेडेकर
    राज्यात महायुती सरकारच्या कार्यकाळात सावळा गोंधळ आहे. हा गोंधळ संपवायचा असेल तर ही विधानसभेची निवडणूक आपल्याला युद्धाप्रमाणे लढावी लागेल, असे म्हणत त्यांनी राहुल बोंद्रे यांना साथ देण्याचे आवाहन केले.
संघर्ष हमारा नारा आहे : राहुल बोंद्रे...
   यावेळी बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की, ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी राज्याचे वाटोळे केले असून या राज्याला पूर्वस्थितीत आणण्यासाठी २० नोव्हेंबरला महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी "संघर्ष हमारा नारा है" असेही राहुल बोंद्रे म्हणाले...