राहुल बोंद्रेही लागले तयारीला! आज १० गावांत.......
Oct 23, 2024, 07:20 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत चांगलीच गाजणार आहे. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची उमेदवारी निश्चित मानल्या जात आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी राहुल बोंद्रेंनी भेटी - गाठींवर जोर दिला आहे..
आज, २३ ऑक्टोबरला राहुल बोंद्रे यांचा चिखली विधानसभा मतदारसंघातील दहा गावात भेटी - गाठी दौरा आहे. सकाळी ८ वाजता किन्होळा, ९ वाजता वाडी - ब्रह्मपुरी, साडेनऊला गावठाण, साडेदहाला कोलारी, साडेअकराला केळवद, साडेबाराला गिरोला, दीड वाजता हातनी, अडीच वाजता मालगणी, ३ वाजता सावरगाव, ४ वाजता सवणा आणि सायंकाळी ५ वाजता वळती या गावांना राहुल बोंद्रे भेट देणार आहेत. गावोगावी होणाऱ्या या दौऱ्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी राहुल बोंद्रे यांच्या समवेत असणार आहेत...