किन्होळा, साखळी बु मध्ये राहुल बोंद्रेंचे दमदार स्वागत; जाहीर सभेला तुडुंब गर्दी; राहुल बोंद्रे म्हणाले, आवाज दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडा....
Nov 18, 2024, 08:52 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना प्रचारात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या कॉर्नर बैठका, गावा गावात धुमधडाक्यात होणारे स्वागत यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे. दरम्यान काल,१७ नोव्हेंबरच्या सायंकाळी किन्होळा आणि साखळी बु येथे राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडल्या, दोन्ही गावात राहुल बोंद्रे यांचे दमदार स्वागत झाले.. यावेळी प्रचार सभांना तुडुंब गर्दी उसळली होती.. प्रचंड गर्दीच्या साक्षीने राहुल बोंद्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर आसूड उगारला.गेल्या ५ वर्षांत खूप काही सहन केलं..माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, केवळ माझाच नव्हे तर तुमचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला..मात्र आता वारं फिरल आहे. आवाज दडपण्याचा प्रयत्न हाणून पाडा असे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले..
यावेळी पुढे बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. शेतमालाला कचऱ्यापेक्षाही मातीमोल भाव आहे. महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहे, आमच्या लेकी– बाळी सुरक्षित नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या म्हणून यांना लाडकी बहीण आठवली. महाविकास आघाडीचे सरकार महिलांना सुरक्षा तर देणारच आहे मात्र महिला सक्षमीकरणासाठी ३००० हजार रुपये प्रति महिना देणार असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.चिखली विधानसभा मतदारसंघात तर दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. दडपशाही झूगारून मतदान करा, २० नोव्हेंबरला मतदान रुपी आशीर्वाद द्या, मी तुमचा सेवक म्हणून काम करीन असेही राहुल बोंद्रे म्हणाले.