प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले,जालिंदर बुधवत यांच्या रूपाने विजयाची मशाल पेटवायची आहे! नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.
बुलढाणा येथील जनशिक्षण संस्थेच्या सभागृहात प्राध्यापक खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, संदीप शेळके , प्राध्यापक डी.एस. लहाने , माजी सभापती सुधाकर आघाव, अशोक मामा गव्हाणे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा शहर प्रमुख हेमंत खेडेकर, मोताळा शहर प्रमुख रमेश धूनके, आशिषबाबा खरात, युवा सेना तालुका प्रमुख संजय शिंदे, युवा सेना शहरप्रमुख सचिन परांडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक खेडेकर म्हणाले की, बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकदा निवडून आलेला आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही. शिवसेनेसोबत गद्दारी करणारा आमदार इथे पुन्हा आमदार होत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्वासक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. जालिंदर बुधवत यांच्या रूपाने आपल्याला विजयाची मशाल पेटवायची आहे. काही लोक खोट्या बातम्या पेरतात आणि त्याची चर्चा घडवून आणतात. काळजी करण्याचे कारण नाही ,मातोश्रीवर केवळ निष्ठावंतांचीच काळजी घेतली जाते. असे सूचक विधान सुद्धा प्राध्यापक खेडेकर यांनी केले.