राहुल बोंद्रेंच्या प्रचारार्थ खा.प्रणिती शिंदे आज चिखलीत! "महालक्ष्मी सन्मान" मेळाव्याला करणार संबोधित....
Nov 10, 2024, 08:36 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी खा.प्रणिती शिंदे आज,१० नोव्हेंबरला चिखली येथे येत आहेत.
चिखली येथील राजा टॉवर जवळ महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत. दुपारी ११ वाजता हा मेळावा होणार असून "महालक्ष्मी सन्मान मिळावा" असे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले आहे. सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे..