पॉलिटिक्स! "त्यांच्याही घरात महिला, माझ्या मतदारसंघातील सरपंचांनाही धमक्या!" आमदार श्वेताताई महालेंचा आमदार संजय गायकवाडांवर निशाणा...एकनाथ शिंदे श्वेताताईंना म्हणाले, "सिरियसली" घेऊ नको..
Mar 24, 2026, 15:56 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यातील वाद आता कमालीच्या टोकापर्यंत पोहोचला आहे. रविवारी सायंकाळी बुलढाणा येथील आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात चिखली विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश झाला होता, यावेळी आमदार गायकवाड यांनी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना उद्देशून काही आक्षेपार्ह विधाने केली होती. माझ्या मतदारसंघात मी सामान्य कार्यकर्त्यांना त्रास देत नाही, कुणाचा छळ करत नाही, आता चिखलीत कुणाचा छळ होऊ देणार नाही..आता तिथे कुणाची माय**** ते मी पाहतो असे म्हणत आमदार गायकवाड यांची जीभ घसरली होती. दरम्यान यावर आता चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे आज सकाळी एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्वेताताई यांची भेट झाली असता शिंदे यांनी त्याला(संजय गायकवाड) सिरियसली घेऊ नको,आम्ही बघतो असे म्हटल्याचे आ. श्वेताताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार श्वेताताई म्हणाल्या की ,प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा असतो, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा..फक्त हे वाढवत असताना जाणीवपूर्वक काही लोकांना धमक्या देणं माहितीचा अधिकार टाकणं, दमदाटीची भाषा करण, आम्ही आखाड्यातले आहोत..
आखाडा कुणाला मान्य नाही, आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणारे आहोत, लोकशाही मानणारे आहोत ..काय करायचे हे जनता ठरवेल, आखाड्याची भाषा करू नका.. जनतेच्या सेवेची भाषा करा तेव्हा आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू असे आ. श्वेताताई म्हणाल्या. मात्र आखाड्याची भाषा करत असाल, महिलांना शिवीगाळ करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही..अशा खालच्या पातळीवरच्या भाषेचा आम्ही निषेधच करतो असेही आ.श्वेताताई विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. महिलांबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करणे निषेधार्य आहे, चुकीचे आहे.. त्यांच्याही घरात महिला आहेत, त्याही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात..परंतु त्यांची ही भाषा सुसंस्कृतपणाची नाही असे आ. श्वेताताई म्हणाल्या..
सरपंचांना आमदार गायकवाडांकडून धमक्या?
"माझ्या मतदारसंघातील जे बुलढाणा तालुक्यातील गावे आहेत तिथल्या सरपंचांना शिवसेनेचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक माहितीच्या अधिकारात पत्र टाकून परेशान करतात. दोन चार पत्र टाकल्यानंतर त्यांना हळूच जाऊन सांगतात की" संजूभाऊ चा निरोप आहे"तुमचा मतदारसंघ चिखली असला तरी तुमची पंचायत समिती आणि तहसील बुलढाणा आहे. तुम्हाला जर सुरळीत काम करायचा असेल तर शिवसेनेत प्रवेश करा.. अशा पद्धतीची दमदाटी, दादागिरी हे त्यांच्याकडून माझ्या मतदारसंघात चालू आहे असा आरोपही आ. श्वेताताई महाले यांनी केला आहे..