महिंद्रा बोलेर पिकप मध्ये पोलिसांना सापडला माल! बोराखेडी पोलिसांची धमाकेदार कारवाई....

 
 मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : बोरखेडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खामगाव येथून मोताळाकडे येत असणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी पकडून तिची पाहणी केली असता गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा मिळून आला. एकूण ३८,८२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे...
बोरखेडे पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खामगाव येथून मोताळा कडे येत असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप ला बोरखेडी फाटा येथे नाकाबंदी करून पिकअप अडवून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. तब्बल २५,८२,००० रूपांचा मुद्देमाल आढळून आला. तसेच पिकअप किंमत ११,००००० असा एकूण ३८,८२,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पिकअप चालक अजय सिद्धार्थ खंडारे रा. भीमनगर शिराजगाव खामगाव तसेच विशाल संतोष कांबळे रा. चांदमारी फैल खामगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
बाराखडी पोलीस स्टेशन ते ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात पो.उपनि.राजेंद्र कपले, पो.हे.कॉ. नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, ना.पो.कॉ. श्रीकांत चिटवार, रमेश नरोटे, पो.कॉ. गणेश बरडे, श्रीकांत चिंचोले, वैभव खरमाळे रवींद्र नरोटे