जनतेच्या अफाट प्रेमाने भारावलो;आमदार संजय रायमुलकर यांचे भावोद्गार! म्हणाले, "हीच" माझी खरी कमाई! पळसखेड येथे आ. रायमुलकरांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); माझ्याइतके जनतेचे प्रेम कुठल्याही आमदाराला मिळाले नसेल.मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्ययाला येणारे सामान्य माणसांचे असीम प्रेम ही माझी खरी कमाई असून पळसखेड येथील माझ्या मतदारांनी माझी सजविलेल्या बैलगाडीतून काढलेली मिरवणूक आणि फुलांचा केलेला वर्षाव ,खरेच मी कृतकृत्य झालो आहे ,असे चिंब भावनांनी ओथंबलेले उदगार आमदार संजय रायमुलकर यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट केला. जनतेचे असे जगावेगळे प्रेम,स्नेह पाहून आमदार रायमुलकर खूपच भावनिक झाले होते.गाव दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या ताफ्यासह पळसखेड येथे आगमन झाले तेंव्हा नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे उस्फुर्त स्वागत केले.नारळाच्या फांद्या ,फुलांनी सजविलेल्या बैलगाडीतून महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.जेसीबी द्वारे फुलांच्या पाकळ्यांची मोठ्या प्रमाणावर उधळण करण्यात आली.कोण आला रे कोण आला,शिवसेनेचा वाघ आला , असा कसा येत नाही,आल्याशिवाय रहात नाही अशी युवकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत व गावातील मंदिरांमध्ये दर्शन घेत आमदार रायमुलकर यांनी मोठ्या संख्येने धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे घरोघर जात आवाहन केले.
 गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत प्रचंड जल्लोषात प्रचार रॅलीने संपूर्ण गावाची परिक्रमा केली.नंतर झालेल्या सभेत आमदार संजय रायमुलकर यांनी वरील भावोदगार काढले .भावनाविवश होत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. लोकांचे निरपेक्ष प्रेम पाहून नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली. स्वतःला कसेबसे आवरत त्यांनी पुढे भाषण सुरू ठेवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडसी निर्णय घेत लोकांच्या भल्यासाठी अहोरात्र काम केल्याचे सांगून रायमुलकर पुढे म्हणाले की,त्यांचा प्रत्येक लोकोपयोगी निर्णय महत्वाचा आहे.जास्त रक्कम भरावी लागत होती म्हणून खूप कमी शेतकरी पीकविम्याचे प्रस्ताव सादर करत होते,परंतु महायुती सरकारने एक रुपयात पीकविमा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोठा फायदा झाला .अतिवृष्टी , दुष्काळ , गारपीट यामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मीळवून देण्यात आली.त्यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवला. भावफरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आली.
लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना अधिक सक्षम करण्याचे काम करण्यात आले,असे सांगून संजय रायमुलकर म्हणाले की, बोलतो तसे करतो असे एकनाथ शिंदे यांचे काम असून सरकारने पाच महिन्यांची प्रत्येकी साडेसात हजार रुपये मायमाऊल्यांच्या बँक खात्यात जमा केले.मेहकर,लोणार तालुक्यातील एक लाख ७ हजार लाडक्या बहिणींच्या खात्यात ७९ कोटी ५४ लाख रुपये जमा करण्यात आले.यामुळे महिला सक्षमीकरणआणि सोबतच ग्रामीण भागातील अर्थचक्रालाही गती मिळाली. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मतदान करून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे रायमुलकर यांनी आवाहन केले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांच्यासह इतर वक्त्यांनी यावेळी आपले विचार मांडले.तालुका प्रमुख भगवानराव सुलताने , डॉ.एकनाथ घुगे , विजय सानप , भाजपचे ऍड. शिवाजी सानप, महिला आघाडीच्या आशाताई झोरे , श्रीमती अंजलीताई गवळी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि महिला , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील पहूर, दाभा, जफ्राबाद, बागुलखेड, गुंधा , गुंजखेड, हिरडव, गायखेड या गावांना भेटी देऊन आमदार संजय रायमुलकर यांनी नागरिकांशी हितगुज केले.प्रत्येक गावामध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी दिसून आले.प्रचार रॅल्यांमध्ये महिला ,पुरुष ,युवकांचा सहभाग बघता रायमुलकर यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून आले...