वनसाईड मतदान - सिर्फ धनुष्यबाण मुस्लिम बांधवांनी झळकवले बॅनर! आ.डॉ.संजय रायमुलकर म्हणतात,मुस्लिम बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव तत्पर...
मुस्लिम समाजाच्या वतीने संजय रायमुलकर यांचा अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.यावेळी ९६ मुस्लिम युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यांचा आमदार रायमुलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आपला भाषणात आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, प्रतापरावजी जाधव आणि मी सातत्याने अठरापगड जातीच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत .अल्पसंख्यांक समाजासाठी अनेक गावांमध्ये शादीखाने, कब्रस्तानला संरक्षण भिंती, सिमेंट रस्ते आदी २० कोटींची कामे केली. शहरातही इमामबाडा येथे ५० लाखाचा शादी खाना पंचपीर दर्गा येथे५० लाखाची विविध कामे ,गवळीपुरा येथील ५० लाखांचा शादीखाना, मोळा रोड वसाहतीत २५ लाख रुपयांचा शादीखाना आदी कामे प्रगतीत आहेत.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक लाभ मुस्लिम समाजाच्या आयाबहिणींना आम्ही मिळवून दिला आहे .कुठेही जातीभेद केलेला नाही. याउलट काँग्रेसने आतापर्यंत जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे राजकारण केलेले आहे, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीत विरोधातील उमेदवार मुंबईत राहणारा असून काम पडल्यास आम्हीच नेहमी धावून येतो. लोकसभा निवडणुकीत बाहेरचे उमेदवार आले आणि गेले ,ते पुन्हा दिसले नाही ,असेही रायमुलकर म्हणाले.