पुन्हा एकदा श्वेताताईच; महायुतीचा महानिर्धार.. उद्या धाड येथे महायुतीचा महामेळावा! चिखली मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते राहणार उपस्थित...
Oct 26, 2024, 08:58 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे. गुरू पुष्यामृत मुहूर्तावर त्यांनी प्रचाराचे नारळ देखील फोडले असून गावोगावच्या भेटी - गाठी दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.पुन्हा एकदा श्वेताताईच आमदार असा महानिर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, त्यासाठी जो तो आपापल्या परीने कामाला लागला आहे..
दरम्यान उद्या,२७ ऑक्टोबरला चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा धाड येथे ठेवण्यात आला आहे. उद्या दुपारी साडेचार वाजता धाड येथील ज्ञानदेवराव बापू जूनियर कॉलेज येथे हा महायुतीचा महामेळावा होणार आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील बुलडाणा तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून प्रचारयंत्रणेचे बारीक सारीक नियोजन या मेळाव्यात करण्यात येणार आहे..