खामगाव जिल्हा निर्मितीवर मंत्री आकाश फुंडकर म्हणाले, अर्धवट जिल्हा.....
Jan 22, 2025, 10:57 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून आहे. दरम्यान आता सोशल माध्यमांवर २६ जानेवारीला खामगाव जिल्हा निर्मितीची घोषणा होणार असल्याचा मॅसेज फिरत आहे. यावर कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, ते म्हणाले की अर्धवट जिल्हा करून घेण्यात काही अर्थ नाही...
जिल्हा निर्मितीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टींची प्राधान्याने पूर्तता करावी लागणार आहे. एक जिल्हा निर्मिती करण्यासाठी शासनाला मोठा फंड लागतो. खामगाव जिल्हा भावा ही अनेक वर्षांपासून ची मागणी असून त्या दृष्टीने आपली प्रयत्न सुरू आहेत, खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची वाट देखील आपण त्या दृष्टीने केलेली आहे. खामगावला आरटीओ ऑफिस देखील आपण निर्माण केले असून एम एच ५६ अशी ओळख आता आपल्याला मिळाली आहे. जिल्हा निर्माण करण्यापूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले पाहिजे या मताचा मी आहे असे आकाश फुंडकर म्हणाले. अर्धवट जिल्हा करण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे आवश्यक ती पूर्ण तयारी करून जिल्हा निर्मितीच्या दिशेने शासनाकडून पावले उचलली जात आहेत असे ते म्हणाले..