अरेरे... खरातांवर ही काय वेळ आली! मेहकरात रॅलीसाठी २०० रुपये रोज?महिलेचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाल्या, २०० रुपये रोजाने आलो पण मशाल आजच पडली....पहा व्हिडिओ

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ आता अवघ्या काही तासांवर आलेली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आज प्रचारावर भर दिला होता.दरम्यान मेहकर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांची रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता या रॅलीसाठी आलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २०० रुपये रोजाने आलो पण मशाल आजच पडली असे ती महिला त्या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

रम्यान सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत असून नेटकरी खरात यांना ट्रोल करत आहे. खरात यांना रॅलीसाठी पैसे देऊन लोक आणावी लागल्याची चर्चा मतदार संघात पसरली असून यामुळे खरात यांच्या समर्थकांचे मनोधैर्यही खचले आहे..