ना. प्रतापराव जाधवांचा आज सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दौरा! डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी मैदानात; मेरा बु, अंढेरा,सावखेड तेजन, सावखेड भोई येथे मतदारांशी साधणार संवाद...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. उद्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.खेडेकर यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. दरम्यान आज,११ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी सिंदखेड राजा मतदारसंघात दौरा करणार आहेत..
 केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी बळ उभे केले आहे. आज,सकाळी १०:३० वाजता मेरा बु,१२ वाजता अंढेरा ,१:३० वाजता सावखेड तेजन,दुपारी ३ वाजता सावखेड भोई असा केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा दौरा आहे. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचार दौऱ्यात उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.