ज्या भावाच्या पाठीशी बहिणींचं प्रेम त्या भावांच कुणी वाकडं करू शकतं नाही! लाडक्या बहिणींच्या प्रचंड गर्दीसमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन! आ. गायकवाडांचे केले तोंडभरून कौतुक...

 
फडणवीस

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्या भावांच्या पाठीशी एवढ्या बहिणींचं प्रेम आहे ,त्या भावांच कुणी वाकडं करू शकत नाही. जोपर्यंत महायुती शासन आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत, विरोधक आम्हाला थांबवू शकत नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुलडाणा येथे शारदा ज्ञानपीठच्या भव्य मैदानावर आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात प्रचंड जनसागराला संबोधित करताना ना.फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थिती होते.

Jadhav
Advt 
बुलडाणा शहरातील २१ महापुरुषांच्या १६ स्मारकांचे लोकार्पण झाल्यानंतर शारदा ज्ञानपीठच्या मैदानात महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराचा कार्यक्रम झाला. जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी महिलांच्या जनसागराला उद्देशून पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचं आणि आमचं आता जन्मभराच नात तयार झालेल आहे. महाराष्ट्रातील १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. लेक लाडकी योजना, एसटी मध्ये महिलांना मोफत प्रवास अशा योजना आपल्या सरकारने सुरू केल्या. तोट्यात असलेली एसटी महिलांमुळे नफ्यात आली असेही ना.फडणवीस म्हणाले.
Gaykwad
Advt 
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे देशातील क्रांतिकारी योजना ठरली आहे. आतापर्यंत १ कोटी ७ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. आता पुन्हा २ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जाणार आहेत. आम्ही तजवीज अशी केली आहे की पुढील ५ वर्षे ही योजना बंद होणार नाही असे फडणवीस म्हणाले. ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही असे फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले.
१० लाख भावांसाठी देखील सरकारने योजना आणली आहे. शेतकऱ्यांना आता मोफत विज पुरवठा होणार आहे,आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. आता सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा आम्ही करणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जायची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जिगाव प्रकल्पाला ६ हजार कोटी आमच्या सरकारने दिले, अभूतपूर्व असे काम या प्रकल्पाच्या योजनेच्या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले. वैनगंगा - नळगंगा हा ८० हजार कोटींचा प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केला साडेपाचशे किलोमिटर नदीचं पाणी आणून बुलडाणा जिल्ह्याची भूमी सुजलाम सुफलाम करणार असल्याचे ना.फडणवीस म्हणाले.
आमदार गायकवाडांचे कौतुक...
एकाच दिवशी एवढ्या महापुरुषांच्या सोहळ्याचं लोकार्पण हा एक रेकॉर्ड आहे. आमदार संजय गायकवाड यांनी हे चांगल काम केलं आहे असे म्हणत ना.फडणवीस यांनी गायकवाड यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. केवळ महापुरुषांचे पुतळे उभारून आम्ही थांबणार नाही तर महापुरुषांचे विचार अंगिकरण्याचा संकल्प आज आपण करूया असेही ना. फडणवीस शेवटी म्हणाले...