Amazon Ad

काहीही झाले तरी माघार नाही! सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ताकदीने लढणार; योगेश जाधव यांचा पुनरुच्चार! डॉ.शिंगणेंवरही प्रहार! म्हणाले, त्यांना पराभवाची भीती......

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाला मागास ठेवण्याचे काम डॉ.शिंगणे यांनी केले. एवढी वर्षे सत्ता भोगून त्यांना साधे साधे प्रश्न सोडवता आले नाहीत..मी मतदारसंघात ५ वर्षांपासून फिरतो आहे..लोकांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या..त्यामुळे या समस्यांवर उत्तर शोधल्याशिवाय मागे फिरणे मला पटणारे नाही..त्यामुळे काहीही झाले तरी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार म्हणजे लढणारच असा पुनरुच्चार शिवसेनेचे युवा नेते योगेश जाधव यांनी केला आहे..
सिंदखेडराजा मतदारसंघात सध्या प्रचंड राजकीय उलथा- पालथ सुरू आहे. आतापर्यंत अजित पवार गटात असलेले आ.डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जातील असे जवळजवळ ठरले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे इच्छुकही गोंधळून गेले असून डॉ.शिंगणे यांना विरोध करण्याचा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. दुसरीकडे महायुतीतील इच्छुकांनी देखील उमेदवारीवर दावा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश जाधव यांनी याआधीच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. "बुलडाणा लाइव्ह" ने घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले होते. सिंदखेड राजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे योगेश जाधव त्यावेळी म्हटले होते. दरम्यान निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर आपण ठाम आहोत असे पुन्हा एकदा योगेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे..डॉ.शिंगणे यांना पराभवाची भीती वाटत आहे त्यामुळे त्यांची चलबिचल वाढली आहे..ते कुठेही गेले तरी ते पडणार आहेत. मतदारसंघाला आता परिवर्तन हवे आहे असे योगेश जाधव म्हणाले...