मुस्लिम समाज बांधवांचा आ.संजय रायमुलकरांवर विश्वास! ९० तरुणांचा शिवसेनेत प्रवेश!आ. रायमुलकर म्हणाले,काम करतांना कधीच जात-पात पहिली नाही....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गत ३ निवडणुकांत ज्यांनी मला मतदान केले तेही माझे आणि ज्यांनी केले नाही तेही माझेच आहेत. निवडणुकीच्या काळात राजकारण होत असले तरी निवडणुकीनंतर मात्र निवडून आलेला लोकप्रतिनिधी सर्वांचाच असतो. गेल्या १५ वर्षांत लोकांची कामे करतांना मी कधीच जात पात पाहिली नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच मेहकर लोणार मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवली आहेत असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी केले. मेहकर शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आ. रायमुलकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल ९० मुस्लिम युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.याप्रसंगी आ. रायमुलकर बोलत होते..

यावेळी माजी नगरसेवक हनीफ भाई, शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया, रौफ भाई, समीर कुरेशी, राजीव ठेकेदार, रमेश गायकवाड, अश्फाक गवळी, रमेश भालेराव, दिवाकर मेहकरकर, माजी नगरसेवक तौफिक कुरेशी, जुम्मा भुरीवाले, रहमान भुरीवाले, सादिक शहा,शेख अजीज, शेख कमर, शेख कयुम आदींसह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते. पुढे बोलतांना आ. रायमुलकर म्हणाले की, शिवसेनेने केवळ काम करण्याची शिकवण दिलेली आहे. कामे करतांना जात पात धर्म पंथ भाषा हे भेद शिवसेनेने कधीही पाळले नाहीत. शिवसेना हाच असा एकमेव पक्ष आहे जिथे उमेदवारी देतांना कधीही जात विचारली जात नाही. आतापर्यंत काँग्रेसने जाती जातींमध्ये भांडणे लावून गचाळ राजकारण केले असा आरोपही यावेळी आ. रायमुलकर यांनी केला. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये समाजाची गरज ओळखून शादीखाने, कब्रस्तान संरक्षण भिंती, अंतर्गत सिमेंट रस्ते आदी कोट्यावधी रुपयांची कामे केल्याचे आ. रायमुलकर यावेळी म्हणाले. आम्ही आमच्या बुथवर आधी मतदान दाखवून देऊ आणि रायमुलकर साहेबांना विजयाचे पेढे भरवू असे प्रतिपादन यावेळी माजी नगरसेवक हनीफ भाई आणि तौफिक कुरेशी यांनी केले.