खासदारबी येतील अन् आमदार बी येतील..! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा गौप्यस्फोट; म्हणाले,...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काल, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील खासदारांसाठी व दिल्लीतील महाराष्ट्रीयन पत्रकारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी ठाकरे गटाचे अनेक खासदारही उपस्थितीत होते. दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातूनच अनेक खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता खासदारबी येतील अन् आमदार बी येथील असे ते म्हणाले...
 काल महाराष्ट्रातील खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. काल रात्रीचा कार्यक्रम कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र मी त्यांचा जुना सहकारी आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. पुढच्या काही काळात तिकडचे अनेक खासदार आणि आमदार आमच्याकडे येतील असे ते म्हणाले..