आई रेणुका...शक्ती दे! अर्ज दाखल करण्याआधी राहुल बोंद्रेंनी घेतले रेणुकादेवीचे दर्शन! स्व. तात्यासाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन माथा टेकवला...

 
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान अर्ज दाखल करण्याआधी राहुल बोंद्रे यांनी चिखली नगरीचे आराध्य दैवत रेणुका देवीचे दर्शन घेत प्रार्थना केली. विकासाचे राजकारण करण्यासाठी शक्ती दे अशी प्रार्थना केल्याचे राहुल बोंद्रे यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याआधी राहुल बोंद्रे यांचे त्यांच्या अर्धांगिनी वृषालीताई बोंद्रे यांनी औक्षण केले. राहुल बोंद्रे यांनी वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेतले. स्व तात्यासाहेब बोंद्रे यांच्या समाधीस्थळी जाऊनहीं राहुल बोंद्रे यांनी माथा टेकवला...