आमदार श्वेताताईंच्या गाव भेट दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद ! गावकरी म्हणतात,आम्ही विकासकन्येलाच देणार साथ...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने आपल्या पहिल्याच ९९ उमेदवारांच्या यादीत चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचे चिखलीकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच महायुतीच्या वतीने आमदार श्वेताताईंच्या प्रचाराचे बारीक सारीक नियोजन करण्यात येत आहे. महायुतीची एकजूट आमदार श्वेताईंच्या पथ्यावर पडतांना दिसत असून गावोगावी श्वेताईंच्या गावभेट दौऱ्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे...
Bjp
Related img.

 

 २८ ऑक्टोबरला श्वेताताई महाले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी काल चिखलीत महायुतीची समन्वय बैठक देखील संपन्न झाली. महायुतीतील घटक पक्षांमध्ये असलेला समन्वय, अलीकडच्या २ वर्षात सत्ता असताना मतदारसंघात केलेली हजारो कोटींची विकासकामे या सर्व बाबी श्वेताताई यांच्यासाठी अनुकूल ठरत आहे.गावोगावी मायमाउल्यांचा आशीर्वाद श्वेताताईंना मिळत आहे.गावोगावी होणाऱ्या गावभेट दौऱ्यात श्वेताताई कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत, आता विकासकन्येलाच साथ द्यायची असा निर्धार गावोगावचे मतदार बोलवून दाखवत आहेत...