आमदार श्वेताताईंनी सर्वव्यापी- सर्वस्पर्शी विकास केला! त्यांचा विजय कुणीही रोखू शकत नाही! हभप प्रकाशबुवा जवंजाळ यांचे प्रतिपादन; म्हणाले, आता विकासगंगा वाहती ठेवण्याची जबाबदारी आपली...
Oct 27, 2024, 08:25 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसच्या १० वर्षांत चिखली मतदारसंघ विकासाच्या बाबतीत खूप मागे गेला होता. विकासाचा मोठा बॅकलॉग होता. मात्र आमदार श्वेताताईंनी महायुती सरकार सत्तेत येताच अलीकडच्या दोनच वर्षांत चिखली विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी आणला. सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी विकास कशाल म्हणतात ते श्वेताताईंनी दाखवून दिले..ही विकासाची गंगा वाहती ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला श्वेताताईंनी प्रचंड मतांचे दान द्या असे आवाहन करीत श्वेताताईंचा विजय आता कुणीच रोखू शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरचे विश्वस्त तथा जेष्ठ भाजप नेते प्रकाशबुवा जवंजाळ यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,
पहिल्याच टर्ममध्ये चिखली
मतदारसंघात विकासकामांचा नवा अध्याय लिहिणाऱ्या आमदार श्वेता महाले यांनी राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून हजारो कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला. या माध्यमातून त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी शहर व ग्रामीण भागात करून मतदारसंघाचे रूप पालटण्याचा धडाका लावला आहे. विकासाच्या कार्यात पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देखील मानाचे स्थान देण्याची त्यांची भूमिका असून, चौफेर विकास आणि सर्वाप्रित न्यायाच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत त्या विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. श्वेताताईंनी गेल्या पाच वर्षांच्या काळात ग्रामीण व शहराच्या विकासासाठी अब्जावधीचा निधी खेचून आणला आहे. चिखलीच्या इतिहासात आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने इतका मोठा निधी खेचून आणला नाही. चिखली शहरात महामानवांच्या
पुतळ्यांचे सौंदर्गीकरण तथा शिल्पांची स्थापना, शहर प्रवेशाच्या ठिकाणी भव्य व आर्कषक स्वागतकमानी, अरुंद व खड्डेयुक्त रस्त्यांची दुरवस्था संपवून शहरातील गल्लीबोळांत पक्के व मजबूत काँक्रीट रस्ते केलेत, पथदिवे, वर्दळीच्या ठिकाणी हायमास्ट दिवे, अंतर्गत नाल्यांचे बांधकाम केले. सोबतच प्रवाशांसाठी लक्षवेधी बसथांबे, शहराचे वैभव वाढवण्यासाठी
वैशिष्ट्यपूर्ण स्मारके, सुशोभीकरण, धार्मिक स्थळांचा विकास व आवश्यक सुविधांची निर्मिती, समाजातील सर्व घटकांसाठी समाजभवनांची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व क्रीडा सुविधांची निर्मिती आदी बाबीत आमदार श्वेता महालेंचे काम अलौकीक असल्याने त्यांच्या या कार्यतत्परता व विकासाभिमुख कार्याची पावती मतदार त्यांना देणार आहे.या निवडणुकीत आ. महाले विक्रमी मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास ह.भ.प. जवंजाळ यांनी व्यक्त केला.