आमदार मनोज कायंदेंनी टेकवला गोपीनाथ गडावर माथा! पंकजाताईंचीही घेतली भेट....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी आज,१२ डिसेंबर  गोपीनाथ गडावर माथा टेकवला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनानिमित्त आ. कायंदे आज गोपीनाथ गडावर पोहोचले. तिथे त्यांनी स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या समाधीस्थळी माथा टेकवला. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचीही आ. कायंदे यांनी भेट घेतली...

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारासाठी सिंदखेडराजात आल्या होत्या. दरम्यान त्यावेळी ज्यांच्या हृदयात गोपीनाथ मुंडे त्या उमेदवाराला साथ द्या असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले होते. दरम्यान आता आमदार झाल्यानंतर आ.मनोज कायंदे गोपीनाथ गडावर पोहोचले आहेत...