एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून बुलडाण्यात आमदार गायकवाड यांच्या हस्ते महाआरती! आ.गायकवाड म्हणाले, राज्याची धुरा समर्थपणे.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी संधी मिळावी, यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवार, २८ नोव्हेंबरला शेकडो बहिणींच्या उपस्थितीत शहरातील विष्णूवाडी परिसरतील संत गजानन महाराज मंदिरात महाआरती केली.
राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अजित पवार गटांनी मिळून मागील अडीच वर्षे यशस्वी सरकार चालविले. आतादेखील महायुती सरकार स्थापन करण्याची संधी जनतेने दिली. एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असून राज्याची धुरा ते समर्थपणे व यशस्वीपणे चालवू शकतात, ते पुन्हा मुख्यमंत्री बनावे, यासाठी महिलांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिल्याचे आ.गायकवाड यावेळी म्हणाले...
त्यामुळे राज्याची धुरा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या हाती द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या
वतीने करण्यात आली आहे. गजानन महाराजांनाही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी आ. संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत साकडे घालत महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार गायकवाड यांनी स्वतः सर्वांना आरती दिली. याप्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, माजी नगरसेवक शामराव घट्टे, महिला शहर संघटक इंदुताई घट्टे, विठ्ठल येवले, सुरेश कुलकर्णी, दीपक सोनुने, उमेश अग्रवाल, गजानन मुळे, निशाद येरमुळे, सुरेश धोटे, सुभाष पवार, मनोज यादव, योगेश परसे, मंगेश बिडवे, नांदराम वाघ, अरुण भुतडा, दशरथ हुडेकर, नंदू जाधव व विष्णूवाडी परिसरातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.