आमदार गायकवाडांचा आ.कुटेंवर राग; ना. फुंडकरांवर मात्र प्रेम ही प्रेम....! मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून म्हणाले, जिल्ह्यातल्याच मंत्र्याला बनवा पालकमंत्री...
Updated: Dec 16, 2024, 18:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा ठपका आ.गायकवाड यांनी आ.संजय कुटे यांच्यावर ठेवून खळबळ उडवून दिली होती. दरम्यान आज नागपूर अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलतांना डॉ. संजय कुटे आणि ना. प्रतापराव जाधव यांची तक्रार केल्याचेही आ.गायकवाड यांनी सांगितलं..एकीकडे डॉ. संजय कुटेंबद्दल आ.गायकवाड यांनी राग व्यक्त केला असला तरी दुसऱ्याबाजुला मंत्रीपदाची संधी मिळालेल्या आकाश फुंडकरांबद्दल मात्र सॉफ्ट कॉर्नर दिसत आहे. आज आ.गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बुलडाणा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मंत्रालय संधी द्यावी अशी मागणी करीत ना.आकाश फुंडकर यांच्या नावाला पसंती दर्शवली. तशा आशयाचे पत्र आ.संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
आ.आकाश फुंडकर यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक किती विजय मिळवला आहे. त्यांना जिल्ह्यातील सर्वच घडामोडी, अडचणी, समस्यांची जाण आहे. जिल्ह्यातील समस्यांना ते चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतात. बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यास संधी दिली असती केव्हा ध्वजारोहणाप्रसंगीत उपस्थित राहतात. जिल्ह्याच्या विकासाची गांभीर्य त्यांना नसल्याचे आजपर्यंत पाण्यात आला आहे. स्थानिक मंत्र्यांना मात्र जिल्ह्याच्या समस्यांबाबत वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते, तसेच स्थानिक असल्याने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी देखील त्यांच्यावर अधिक असते म्हणून ॲड.आकाश फुंडकर यांनाच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संधी द्यावी अशी मागणी आ.संजय गायकवाड यांनी केली आहे.