नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; अनेकांना धक्का तर कुठे मिळाली संधी बुलढाणा, खामगाव, नांदुरा आणि लाेणार खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी तर देउळगाव राजात एससी, मलकापूर ओबीसी महिलेसाठी राखीव...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्हा परिषद अध्यक्षपदानंतर ६ ऑक्टाेबर राेजी राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्य बुलढाणा नगर पालिकेसह खामगाव, नांदुरा आणि लाेणार येथे सर्वच महिलांना संधी आहे तर देउळगाव राजा येथे अनुसुचीत जातीच्या महिलेसाठी तर मलकापुरात ओबीसी महिलेसाठी संधी राहणार आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे तर काही ठिकाणी संधीही मिळाल्याचे चित्र आहे. 
जिल्ह्यात ११ नगर पालिका असून दाेन ठिकाणी नगर पंचायत आहे. सध्या ११ नगर पालिकांच्या निवडणुकीची प्रक्रीया सुरू आहे. जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता नगर पालिकांच्या अध्यक्षांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले हाेते.
साेमवारी राज्यातील २४७ नगर पालिका आणि १४७ नगर पंचायतींच्या अध्यक्षपदाची आरक्षण साेडत ना. माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यापैकी अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या ३३ पैकी १७ पालिकांवर महिला राज येणार आहे.