खामगावातून काँग्रेसकडून मंगेश भारसाकळे इच्छुक! दिल्लीत घेतली भुपेश बघेल यांची भेट...
Updated: Oct 18, 2024, 19:10 IST
खामगाव(संतोष देठे पाटील: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगांव विधानसभा मतदार संघात काँग्रेस कडून उमेदवारी साठी प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. खामगांव मतदार संघात काँग्रेसने ओबीसी चेहऱ्याला संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीचा विचार झालाच तर मंगेश भारसाकळे यांना लॉटरी लागू शकते. त्यादृष्टीने भारसाकळे यांनी लॉबिंग देखील सुरू केले असून दिल्लीत त्यांनी वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने विदर्भाची जबाबदारी दिलेल्या माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट भारसाकळे यांनी घेतली असून त्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
मंगेश भारसाकळे यांचे काम पूर्ण मतदार संघात आहे. याच बरोबर महाराष्ट्र सह पूर्ण देशात कुणबी व ओबीसी समाजात त्यांचा दांडगा संपर्क आहे. मंगेश भारसाकळे यांना तिकीट द्यावे अशी मागणी नवोदय विद्यालयच्या च्या माजी विद्यार्थ्यांनी देखील उचलून धरली आहे. नवोदयच्या युनियनचे चे तसे पत्र खा.राहुल गांधी यांना देण्यात आले आहे.
गेल्या १० -१२ वर्षांपासून कुणबी ओबीसी समाजासाठी विविध आंदोलने केल्यामुळे भारसाकळे यांची समाजात चांगली प्रतिमा आहे. ७० टक्के ओबीसी वर्ग मंगेश भारसाकळे यांच्या मागे राहू शकतो असा निष्कर्ष काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सर्वेतून समोर आल्याची चर्चा आहे.सामान्य घरातील मंगेश भारसाकळे हे नवोदय चे माजी विद्यार्थी असून त्यांनी अभियांत्रियेचे शिक्षण पूर्ण केले आहे. मतदार संघात सामाजिक पकड, पक्षाशी एकनिष्ठ व राज्यसह देशभरात सामाजिक व राजकीय काम यामुळे मंगेश भारसाकळे हे भूपेश बघेल यांच्या गुड बुक मध्ये आहेत..बघेल यांनी देखील
भारसाकळे यांची बाजू लावून धरल्याने सूत्रांनी सांगितले...