मलकापूर पांग्रा पुन्हा कडकडीत बंद! संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना जेरबंद करण्याची मागणी...

 
 मलकापूर पांग्रा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपींना तातडीने अटक करावी तसेच परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपींना अद्दल घडवावी या मागणीसाठी आज मलकापूर पांग्रा येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...

  मागील आठवड्यात देखील परभणी घटनेच्या निषेधार्थ मलकापूर पांग्रा येथे बंद पुकारण्यात आला होता. आज सकाळपासूनच हॉटेल, सलून, किराणा दुकानदार व इतर दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवत बंदमध्ये सहभाग घेतला. संतोष देशमुख हत्याकांड आणि परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. बंद यशस्वी करण्यासाठी, सरपंच पती यादव टाले, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव गवई, ग्रामपंचायत सदस्य राजू साळवे, शरद आटोळे, अमोल देशमुख, कैलाश देशमुख, अंकुश देशमुख, गजानन देशमुख ,निलेश काकडे, विजय आटोळे, अरुण टाले, सुनील बनसोडे, रुपेश गायकवाड, उद्धव देशमुख, गोपाल देशमुख, राजू देशमुख, रत्नाकर पंखुले, बळीराम उगले, रवि वायाळ, कुलदीप टाले, विलास देशमुख,रामा गवई आदींनी पुढाकार घेतला...