जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश उपलब्ध करून द्या! अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन; शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचा निर्वाणीचा इशारा

 
Hdjd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनापूर्वीच गणवेशाचे वाटप होते. यंदा मात्र स्वातंत्र्यदिन उलटून गेला, दिवाळी जवळ आली तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा निर्वाणीचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी दिला. आज,३० सप्टेंबरला श्री बुधवंत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना तशा आशयाचे निवेदन दिले.
   जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांतील दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गणवेशाचे वाटप केले जाते. यंदा मात्र काय झाले कुणास ठाऊक, स्वातंत्र्य दिन झाला, एक सत्र संपण्याची वेळ आली तरी गणवेश वाटपाची कोणतीही हालचाल नाही. अनेक गोरगरीब विद्यार्थी मागील वर्षीचे जुनेच गणवेश घालून शाळेत येत आहेत.👇
त्यामुळे प्रशासनाने वेळीच गणवेश वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जालिंधर बुधवंत यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख लखन गाडेकर, किसान सेना तालुका प्रमुख अशोक गव्हाणे, युवा सेना तालुकाप्रमुख संजय शिंदे, युवा सेना शहरप्रमुख सचिन परांडे, एकनाथ कोरडे, मोहम्मद सोफीयान, अनिकेत गवळी, राहुल जाधव, अनिल राणा, किशोर कानडजे, सागर हिवाळे, यासीन तान्हा, विकास निर्मळे, शेख फिरोज यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.