महिमळच्या सरपंचाचा सदस्यांसह शिवसेनेत प्रवेश! काँग्रेसला सोडचिठ्ठी; केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांच्या उपस्थितीत झाला प्रवेश सोहळा;

तालुका प्रमुख गजानन मोरे म्हणाले, ये तो ट्रेलर–अजुन बरेच प्रवेश...

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील महिमळ ग्रामपंचायतच्या सरपंचांसह अख्ख्या सदस्यांनी आज काँग्रेसला रामराम केला. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन सरपंच व सदस्यांनी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत मेहकर येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच व सदस्यांनी भगवा खांद्यावर घेतला...
सरपंच विष्णू भिकाजी खबाईतकर, सदस्य हरिभाऊ जगदाळे, दत्तात्रय येवले, मुरलीधर येवले, समाधान येवले, उत्रादा येथील अमर येवले,स्वराज राजेंद्र इंगळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे यांच्या पुढाकारातून हा सोहळा घडून आला. महायुतीच्या विजयाचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार जनसामान्यांचा विश्वास वाढत आहे. काँग्रेस बुडते जहाज आहे. त्यामुळे विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक नेते शिवसेनेत येत आहे. हा तर केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असे म्हणत चिखली तालुक्यातील उबाठा आणि काँग्रेसचे अनेक पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असे याप्रसंगी तालुकाप्रमुख गजानन मोरे यांनी सांगितले...