देऊळगावराजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेला उसळला महाजनसागर! विराट गर्दी पाहून मुख्यमंत्री म्हणाले, शशिकांत खेडेकरांचा विजय निश्चित!तिकडून इकडे ढोल वाजवणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे आवाहन!

डॉ. शशिकांत खेडेकर हेच महायुतीचे खरे उमेदवार; हा एकनाथ शिंदे शशिकांत खेडेकरांच्या पाठीशी उभा आहे म्हणाले....

 
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज देऊळगावराजात जाहीर सभा पार पडली. जिकडे तिकडे भगवे झेंडे..नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी..असा या सभेचा एकंदरीत माहौल होता. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या साक्षीने डॉ. शशिकांत खेडेकर हेच महायुतीचे अधिकृत आणि खरे उमेदवार आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठासून सांगितले. भूलथापांना बळी पडू नका, अफवांना बळी पडू नका.. त्यांना सांगा हा एकनाथ शिंदे शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी उभा आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.. यावेळी झालेला टाळ्यांचा गजर परिवर्तनाची नांदी देणारा ठरला.यावेळी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. इथे फुकटचे श्रेय घेणारे आहेत.. जाऊ तिथे सत्तेचे लोणी खाऊ अशा वृत्तीचे आहेत.. तिकडून इकडे इकडून तिकडं ढोल वाजवणाऱ्यांना धडा शिकवा.. पंचवीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि आयत्यावर कोयता मारून बसलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माहितीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व यावेळी उपस्थित होते..

 
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही शशिकांत खेडेकर यांना विधानसभेत पाठवा सिंदखेड राजाच्या विकासाची जबाबदारी माझी राहील. डॉ शशिकांत खेडेकर यांची ओळख खऱ्या अर्थाने विकास पुरुष अशी आहे. आमदार नसताना सुद्धा त्यांनी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. इथे बंद पडलेले उद्योग आणि सुरू करणार आहोत. जायकवाडी प्रकल्पाच्या धर्तीवर खडकपूर्णा प्रकल्प येथे पर्यटन केंद्र उभारणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सिंदखेड राजा हे जागतिक पर्यटन केंद्र व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर शशिकांत खेडेकर यांना विधानसभेत पाठवा. तुम्हाला विकास पाहिजे असेल, तुम्हाला योजना पाहिजे असतील, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे असेल शेतकऱ्यांना सन्मान योजना द्यायची असेल. लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुती सरकारच पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 
राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेस मधून आयात केलेला..
 यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. शशिकांत खेडेकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. कुणी दिशाभूल करीत असेल तर त्यांना सांगा हा एकनाथ शिंदे शशिकांत खेडेकर यांच्या पाठीशी आहे असे म्हणत राष्ट्रवादीचा उमेदवार हा काँग्रेस मधून आयात केलेला आहे असे महत्त्वपूर्ण विधान केले. शशिकांत खेडेकर मागील निवडणुकीत पडले तरी सुद्धा तुमच्या बाजूने उभे राहिले..आता ते डायरेक्टर विधानसभेत गेले पाहिजे.आता एवढे कामाला लागा की समोरून कुणीही आले तरी डिपॉझिट जप्त झाले पाहिजे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...