Amazon Ad

उद्या बुलडाण्यात महाविकास आघाडीचे विराट शक्ती - प्रदर्शन! विजयी संकल्प करण्यासाठीच उसळणार जनसागर; जयश्रीताई शेळके दाखल करणार नामांकन अर्ज.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उद्या,२९ ऑक्टोबरला विराट असा जनसागर उसळणार आहे. त्यादृष्टीने शक्ती प्रदर्शन करण्याची परिपूर्ण तयारी महाविकास आघाडीने केली आहे.

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर उबाठा शिवसेनेने जयश्रीताई शेळके यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा पराभव करायचाच या इराद्याने "मातोश्री" ने जयश्रीताई शेळके यांच्यावर विश्वास टाकला. जयश्री ताईंच्या नावाची घोषणा होताच बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आणि प्रचंड आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला. जयश्रीताई शेळके यांच्यासारख्या दमदार आणि तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने महाविकास आघाडीने एकत्रितरित्या जयश्री ताईंच्या विजयासाठी आवश्यक प्लॅनिंग करणे सुरू केले आहे.

काल, बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जयश्रीताईंच्या विजयाचा निर्धार केला आणि त्यासाठी झोकून देऊन काम करण्याची ग्वाही देखील दिली. आता उद्या, जयश्रीताई शेळके आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे कधी नव्हे असा विराट जनसागर बुलडाण्यात उसळणार आहे..