महाविकास आघाडीच्या प्रचाररथाचा भव्य शुभारंभ; चिखलीच्या सर्वांगीण विकासासाठी मविआहाच सक्षम पर्याय : राहुलभाऊ बोंद्रे
चिखलीला नव्या उंचीवर नेण्याचा आमचा अढळ संकल्प : काशिनाथ आप्पा बोंद्रे
स्वच्छ चरित्र, सोज्वळ चेहरा, दयावान व्यक्तीमत्व म्हणून ख्याती असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी आपल्या भाषणात नागरिकांचा विश्वास आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, चिखलीला नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प अढळ असल्याचे सांगितले. जनतेच्या आशीर्वादाने विजय अनिवार्य आहे, चिखलीतील नागरिकांची वाढती साथ, आघाडीची संघटित ताकद आणि विकासनिष्ठ भूमिकेमुळे हा प्रचाररथ मोहीम ‘विजयी सफर’ बनेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे आहेत मविआचे चिखलीतील उमेदवार
महाविकास आघाडीचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे, तर नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष जनार्दन गवारे, प्रिती समाधान बांडे, डॉ. प्रकाश शिंगणे,सौ. उषा साहेबराव डुकरे,श्रीमती सुनिता प्रकाश शिंगणे, रहिम खान पठाण, अंबादास प्रल्हाद खरात ,वहिदा बेगम मो. जक्काउल्ला,सौ.सिमा गोपाल देव्हडे, मो.इसरार अब्दुल जब्बार,रविंद्र मदन महाजन,सौ.शितल संतोष देशमुख, सौ. संध्या आनंद बोंद्रे, उबेद अली शब्बीर खान, सौ. रसिका रवि पेटकर, भारत दयाराम मुलचंदानी, सौ. संगिता विजय गाडेकर, गोपाल मोहन गायकवाड, रत्नदिप यशवंत शिनगारे, सौ. स्वाती अमोल लहाने, सौ. सरस्वती पुरूषोत्तम वायाळ, शेख जाकीर शेख यासीन, सौ.सुप्रिया प्रशांतकुमार भटकर, मो.आसिफ मो. शरिफ, आनंद सुभाष गैची, सौ. रजनी निखील जागृत, सौ. अनिता विनोद बनकर, श्रीराम सखाराम झोरे हे महाविकास आघाडीचे चिखली नगरपालिका निवडणूकीतील उमेदवार आहेत.
