शेतकऱ्यांच्या आयुष्यात "प्रकाश"! वीज प्रश्नांवर श्वेताताईंची भरीव कामगिरी! सिंचनाच्या सोयीमुळे शेतकरी होतोय समृध्द; कोट्यावधी रुपयांच्या कामांमुळे मिटले अनेक प्रश्न...

 
  
चिखली:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेला मायबाप शेतकरी...हे कौतुकाचे उद्गार सोडले तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या नशिबी यायची ती थट्टाच..कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी माय बाप शेतकरी पुरता वैतागून जायचा..मात्र श्वेताताई महाले आमदार झाल्यापासून चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे नशिबंच पालटलं..शासनदरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा करणारी बहीण मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने "प्रकाश" पडला.. महाविकास आघाडी सरकार असताना श्वेताताईंनी महावितरण विरोधात केलेले आंदोलन चांगलेच गाजले..नुसते आंदोलन करून श्वेताताई थांबल्या नाही तर सरकारला शेतकऱ्यांचे तोडलेले वीजकनेक्शन जोडायला भाग पाडलं..अडीच वर्षानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र श्वेताताईंनी कामाचा गिअरच बदलला..सिंचनासाठी आवश्यक असलेल्या वीज समस्येवर ताईंनी केलेली भरीव कामगिरी त्यांना शेतकऱ्यांच्या हृदयात वेगळेच स्थान मिळवून देणारी ठरली...
   पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असते ती वीज. मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सत्ता काळात शेतकऱ्यांना विजेसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. विदर्भातील शेतकऱ्यांकडे तर काँग्रेस आणि मित्र पक्षांचे कायमच दुर्लक्ष राहिले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या हक्काची वीज पश्चिम महाराष्ट्राला देण्यात आली. जी थोडीफार वीज उपलब्ध व्हायची त्यातही त्यातही बऱ्याचदा अडथळे यायचे..रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागायचे..मात्र गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुती सरकार आल्यानंतर या प्रश्नांवर बरेच काम झाले, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात लक्ष घातल्याने आता परिस्थिती बदलत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात तर श्वेताताईंनी प्राधान्याने शेतकरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले असून गेल्या अडीच वर्षांत ११५ गावांत विजेची वेगवेगळी १३५ कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत,त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आमदार श्वेताताईंनी मंजूर करून आणला.
 चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या अडीच वर्षांत ९० नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात आले आहेत. बहुतांश ट्रान्सफॉर्मर हे शेतशिवारांमध्ये बसवण्यात आले आहेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. रोहित्रांची क्षमता वाढ करणे,नवीन विज जोडणी ची कामे, नवीन उच्च दाब वाहिनी टाकणे, शेतकऱ्यांसाठी विशेष लिंक लाईन टाकणे, अतिरिक्त विद्युत पोल टाकणे, मागणीनुसार रोहित्र स्थलांतरित करणे, नवीन लघुदाब वाहिनी टाकणे अशी विविध कामे आमदार श्वेताताईंच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना सिंचन करणे सोयीचे होत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली आहे...
सोलार पार्क घडवणार क्रांती...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल २६ सोलार पार्क आमदार श्वेता ताईंनी मंजूर करून घेतले आहेत. शेतकऱ्यांना लागणारी वीज आणि उपकेंद्रांना होणारा पुरवठा यामधील तफावत भरून काढण्यासाठी सोलार्क पार्कच्या माध्यमातून वीज निर्मिती करून ती उपकेंद्रांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अतिरिक्त वीज मागणीची पूर्तता होणार आहे. विशेष म्हणजे २६ पैकी आण्वी, चांडोळ, जांभोरा या ३ सोलार पार्कच्या कामांना सुरुवात देखील झाली आहे. या कामासाठी जवळपास पावणे चारशे ते चारशे एकर ई क्लास जमीन उपलब्ध देखील करून देण्यात आली असून २६ सोलार पार्कसाठी जवळपास ४०० कोटी रुपयांच्या निधी लागणार आहे. सोलार पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होणार आहे ..