शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वात बुलडाण्यात चक्काजाम! पोलिसांनी केले स्थानबद्ध; एसटी भाडेवाढीचा निषेध! बुधवंत म्हणाले, सरकारचे खायचे दात अन् दाखवायचे दात वेगळे....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वेगवेगळ्या भुलथापा देऊन राज्यात महायुतीचे सरकार आले. आता हाती सत्ता आल्यावर त्यांनी त्यांचे खरे रूप दाखवले आहे. आधी एसटी फुकट फुकट असा प्रचार केला ,आता मात्र यांनी वसुली सुरू केली आहे. एसटी ही सामन्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे सरकारने केलेली भाडेवाढ निषेधार्ह आहे. या सरकारचे खायचे दात अन् दाखवायचे दात वेगळे वेगळे आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे असे प्रतिपादन उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले. राज्य सरकारने केलेल्या एसटी भाडेवाढ च्या नेतृत्वात बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील संगम चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सामान्य जनतेवर लादलेली भाडेवाढ सरकारने तात्काळ मागे घ्यावी. अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेना स्टाईल ने टोकाचे आंदोलन करण्यात येईल. सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडून. त्यांनी बहुमताच्या मस्तीत वावरू नये असा इशाराही यावेळी बुधवंत यांनी केला. आंदोलनाची तीव्रता पाहता बुलडाणा शहर पोलिसांनी बुधवंत यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे..यावेळी आंदोलनात यावेळी जिल्हा संघटक प्रा डी .एस .लहाने सर, ॲड. सुमित सरदार, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, उप जिल्हाप्रमुख डॉ अरुण पोफळे, किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, गणेश सोनूने, की से तालुका प्रमुख गजानन उबरहंडे, दलीत आघाडीचे बबन खरे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, एकनाथ कोरडे, किशोर कानडजे, मोहम्मद सोफियान, राजु बोरसे, अनिकेत गवळी, माजी सभापती सुधाकर आघाव, समाधान बुधवत, रवी गोरे, राहुल जाधव, शाम सावळे, संजय गवळी, रामेश्वर बुधवत, शेख मुज्जमीर, रहेमान कुरेशी, शेषराव सावळे, भीमराव लवंगे, सुभाष आराख, विठ्ठल गायकवाड, सागर हिवाळे, विकास निर्मले, नरेश खरे, भानुदास जगताप, किरण पाटील, दिपक पाटील, दिनकर पांडे, संदीप जाधव, निलेश गाडेकर, लोखंडे, राहुल बाजारे, श्रीकांत जाधव, अनिल पडोळकर, संदीप सावळे, सतीश राजपुत, उदय देशमुख, बाळू शेळके, विनोद तायडे, दिंगबर दळवी प्रवीण वाघ, शाम खडके, वसंता सावळे, शेषराव सावळे, मधुकर महाले, मुकुंदा काळे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.